वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ पासूनच हिट ठरली होती. या सिनेमानंतर दोघांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन सिनेमांमध्ये काम केले. हे तीनही सिनेमे सुपर हिट ठरले होते. पण या तीन सिनेमांनंतर दोघांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रेक्षकांना नवी जोडी पाहता यावी म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण आता त्यांना आपलाच नियम तोडावा लागला. दोघं पुन्हा एकदा चित्रीकरणासाठी एकत्र आले आहेत. पण हे कोणत्याही सिनेमाचे चित्रीकरण नसून एका जाहिरातीसाठी हे एकत्र आले आहेत.