मुंबई : यावर्षी ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमांच्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमार आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सारगढी युद्धावर आधारित असणाऱ्या या सिनेमाचं नाव ‘केसरी’ असणार आहे.
या सिनेमाची निर्मिती अक्षय कुमार आणि करण जोहर दोघे मिळून करणार आहेत. २०१९ मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या सिनेमाविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.