सातारा: राज्यातील इतर शहरांबरोबरच सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. प्रशासनाकडून करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृद्धाश्रमातील २३ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
सातारा येथील सातारा महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील २८ ज्येष्ठ नागरिकांना पैकी २३ जेष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक महागाव येथे दाखल झाले आहे.
या वृद्धाश्रमात ५७ ते ७५ वयाचे २८ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. २३ करोना बाधित रुग्णांपैकी सात रुग्णांना कोमोअर्बीडची लक्षणे दिसत आहेत.
बाकीच्यांना किरकोळ लक्षणे आहेत. त्यांचे वय आणि त्यांना दिसून येणारी लक्षणे विचारात घेता सात लोकांना सातारा येथील करोना केंद्रावर हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉक्टर श्रीकांत कारखानीस यांनी सांगितले.
सुरूवातीला या वृद्धाश्रमातील चार ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लागण झाली. त्यामुळे वृद्धाश्रमातील इतर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असता १९ ज्येष्ठ नागरिक करोनाबाधित असल्याचे आढळून आले.
यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. या बाधितांमध्ये सात रुग्णांना डायबेटिस ब्लड प्रेशर आदी कोमोअर्बीडची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांना सातारा येथील करोना केंद्रावर पाठविण्यात आले आहे. या परिसरातील लोकांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या वृद्धाश्रमातील सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना त्याच ठिकाणी विळीगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, असे डॉक्टरांनी सांगितलं. साताऱ्यातील वृद्धाश्रमात एकाच ठिकाणी एवढ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.