Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेआम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत; पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर्स

आम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत; पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर्स

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह काही आमदारांच्या समर्थनार्थ भाजपला पाठींबा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात मुंबईत घोषणाबाजी केली.
शरद पवारांच्या समर्थनार्थ ‘आम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत!’, समस्त बारामतीकर, असे शब्द असलेले हे पोस्टर असून ते सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शरद पवार हे सध्या मुंबईत असून बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेऊन राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षात परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहेे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments