Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेनरेंद्र मोदी तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलणार; राज ठाकरेंचा सवाल

नरेंद्र मोदी तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलणार; राज ठाकरेंचा सवाल

raj thackeray rally mumbai assembly election 2019कोथरूड : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 370 च्या निर्णयाबाबत बोलत फिरत आहेत. मोदी तुम्ही 370 चा निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु, तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी बोलणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
पुणे येथील कोथरुडमध्ये राज ठाकरे सभेमध्ये बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे देश संकटात सापडला आहे. त्याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्याला पुढ बरचं भोगावं लागणार आहे. मंदी सुरु झाली, अजून आवळलं नाही. अशी घाणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून कोथरूडमध्ये का आले? निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील सापडणार सुध्दा नाही. तुम्हीच ठरवा तुमच्या हाकेला ओ देणारा आमदार पाहिजे का? असा प्रश्न कोथरुडकरांना विचारला. चंद्रकांूत पाटलांना येथून उमेदवारी का दिली. त्यांच कार्यक्षेत्र कोल्हापूर असतांना त्यांना येथे  का पाठवण्यात आले. हा या जातीचा तो त्या जातीचा या निकषावर उमेदवारी दिली जात आहे. मी जातपात मानत नाही. महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश, बिहार करायचं का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला.
पाच लाख उद्योग बंद झाले. ज्यांना नोक-या होत्या त्यांच्या नोक-या गेल्या. परंतु, काही जण नोकरीच्या शोधात आहेत, परंतु उद्योग बंद होत आहेत. त्यामुळे मोठे संकट आले आहे. याची सत्ताधा-यांना चिंता नाही. त्यांना तुमच्याशी काहीच देणे घेणे नाही. कारण सत्ताधा-यांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. असेही, राज ठाकरे म्हणाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments