Saturday, October 5, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमाजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन; मंगळवारी अंत्यसंस्कार 

माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन; मंगळवारी अंत्यसंस्कार 

Justice-p-b-sawant-passed-away today
Justice-p-b-sawant-passed-away today

पुणे: माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.

पी बी सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. पी बी सावंत १९८९ ते १९९५ या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले.

लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून काम केलं होतं

सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय होते तसंच आग्रहानं भूमिका मांडत होते. वर्ल्ड प्रेस कऊन्सिल आणि प्रेस कऊन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिलं. तसंच यादरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments