पुणे मतदारसंघात विधानसभेच्या आठ जागा आहेत. युतीमध्ये आठही जागा भाजपच्या वाटेला आल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिका-यांनी थेट मातोश्री गाठली व भाजपच्या उमदेवारांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे पुण्यातही गोंधळ उडालेला आहे.
पुणे मतदारसंघात किमान दोन मतदारसंघ हे शिवसेनेला हवे होते. परंतु भाजपाने आठही मतदारसंघ आपल्यात ताब्यात ठेवले. पुण्यात खासदारही गिरीष बापट असून, महापालिकेवरही भाजपचाच ताबा आहे. विशेष म्हणजे आठही आमदार भाजपचे असल्यामुळे भाजपने शिवसेनेला येथे कोणतेही स्थान दिले नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी काम करणारे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत.