Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार

उध्दव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार

Uddhav Thackeray will take over as Chief Minister todayमुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज शुक्रवारी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. राज्यपालांचं अभिभाषण आणि अध्यक्षांची निवड शनिवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी शपथविधी घेतल्यानंतर बैठक घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो की हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण हे सरकार राहू देणार नाही. पहिला प्रस्ताव अभिमान वाटावा असाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आले. अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दुसरी बाब अर्थातच शेतकऱ्यांची महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. मी मुख्य सचिवांना असे निर्देश की जी मदत दिली आहे गेली त्याचं वास्तव चित्रण द्यावं. एक ते दोन दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर मोठी मदत करणार येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे पदरात काही पडलेलं नाही हे आम्हाला समजलं आहे. असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

गुरुवारी पहिलीच मंत्रिमंडळाची झाली. या बैठकीत हे दोन निर्णय घेण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य नाही तर तो आमचा निश्चय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आपला महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य आपण करु असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments