Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रसोलापुरात जन्मले दोन डोक्यांचे मूल

सोलापुरात जन्मले दोन डोक्यांचे मूल

tow head babyसोलापूर : शहरातील छत्रपती सर्वोपचार रुग्णालयात बाळाचा जन्म झाला. या बाळाला  २ डोकं, २ हृदय, २ श्वसननलिका, २ हात, २ पाय, १ लिव्हर आणि २ किडनी असून शरीर मात्र एकच आहे. या सयामी बाळाचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

विडी घरकूल परिसरातील महिलेला प्रसुतीसाठी येथील छत्रपती सर्वोपचार शासकीय रुग्णालयात बुधवारी दाखल केले होते. वैद्यकीय नियमांप्रमाणे संबंधित मातेची प्रसूतीपूर्व सोनोग्रॉफी करण्यात आली. यावेळी जुळे असल्याची कल्पना त्यांना देण्यात आली. गुरुवारी सकाळी या महिलेचे सिझर केले असता प्रसूतीनंतर २ डोके असलेले बाळ जन्माला आले.
वैद्यकीय परिभाषेत याला ‘कोजाईन्ड टिष्ट्वन’ म्हटले जाते. जन्माला आलेल्या बाळाला २ हृदय, २ श्वसननलिका, २ हात, २ पाय, १ लिव्हर आणि २ किडनी असून शरीर मात्र एकच आहे. या बालकाला रुग्णालयातील बी ब्लॉकमध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या बाळाला ऑक्सिजन, सलाईन आणि अन्य औषधे सुरू आहेत. या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. अशा बाळांना फुफ्फूस, ह्दयाचे इतर आजार असू शकतात. असा प्रकारे जन्मणारे बाळ लाखात एक असू शकते. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळावर बालरोग विभाग प्रमूख डॉ. शाकिरा सावस्कर, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन चक्रे उपचार करीत आहेत, या बाळाच्या आजाराची कल्पना त्याच्या पालकांना अगोदरच होती. प्रसूतीपूर्व तपासणीमध्ये याचे निदान झाले होते. रुग्णालयात स्त्रीरोग विभागप्रमूख डॉ. विद्या तिरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिझर करण्यात आले. हॉस्पिलटलचे तज्ज्ञ डॉक्टरांसह डॉ. जय धडके, डॉ. श्रवण बाळाच्या उपचारावर लक्ष ठेऊन आहेत, त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments