Wednesday, May 1, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादगोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे पाटलांचा...

गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे पाटलांचा सवाल

औरंगाबाद: औरंगाबाद हिंसाचार या घटनेमुळे संपुर्ण औरंगाबाद हादरुन गेले आहे. शहरातील मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, चेलीपुरा भागात दंगल उसळते, हे येथील इंटेलिजन्सचे फेल्युअर असून पोलिसांची गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला गेली होती, असा खोचक सवाल विधान सभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

या दंगलीची कमिश्नर ऑफ इन्क्वायरी अॅक्टनुसार चौकशी करण्‍याची मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर प्रक्षोभक वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई झालीच पाहिजे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (रविवार) शहगंज भागाची पाहाणी केली. नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील दंगल ही पूर्व नियोजित होती.

शह विरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे हापटाईम तर गुन्हेगार फुलटाईम काम करत असल्याची टीका विखे पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर केली. येथील इंटेलिजन्सचे फेल्युअर असून पोलिसांची गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला गेली होती, असा खोचक सवाला विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पोलिस अधिकार्‍यांचा संपूर्ण वेळ हा केवळ सत्ताधारी नेत्याची हाजी हाजी करण्यातच जात आहे. सत्ताधार्‍यांच्या सांगण्यावरून पोलिस विरोधी पक्षांच्या नेत्यांची टेहाळणी करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments