महत्वाचे…
१.विरुद्ध दिशेने आलेला ट्रक व मालवाहू यांच्यात समोरासमोर धडक. वरोरा येथे आज होता आठवडी बाजार ३. चार जण गंभीर जखमी
चंद्रपूर : वरोरा- चिमूर मार्गावरील परसोडीनजीक ट्रक आणि मालवाहूमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सावरी येथून मालवाहु क्र. एम एच ३४ एबी ५६२० ने मृत व जखमी झालेले सातही जण वरोरा येथे आज आठवडी बाजार असल्याने सकाळी भाजीपाला आणण्यासाठी जात होते. दरम्यान, एमएच २६ एपी २७८९ क्रमांक असलेला ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. परसोडीनजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन हा अपघात घडला.
अपघातात सचीन बंडू धाबेकर (२५) रा शेगाव, सुनील गोविंद गोटेफोडे (४९) रा शेगाव, चंद्रशेखर तुळशीराम शेंडे (२२) रा सावरी अशी मृतांची नावे आहेत. तसेच राजेंद्र वैकय्या रामटेके (५५) रा सावरी, नितेश रमेश शिंगारे (२७) रा सावरी, महेश सुभाष कुंडकर (३५) व किशोर महादेव कामडी (३७) सर्व राहणार शेगाव हे जखमी आहेत. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. अधिक तपास वरोरा पोलीस करीत आहे.