Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रविलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमीत्त विलासबाग येथे देशमुख कुंटूबियासह हजारोंनी केले विनम्र अभिवादन

विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमीत्त विलासबाग येथे देशमुख कुंटूबियासह हजारोंनी केले विनम्र अभिवादन

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त विलासबाग, बाभळगाव येथे बुधवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता प्रार्थना सभा झाली. देशमुख कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी स्मृतीस्थळी पुष्पअर्पण करुन लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली आर्पण केली.

सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्यातून खऱ्या अर्थाने विकासरत्न ठरलेल्या आपल्या लाडक्या लोकनेत्यास स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी बाभळगाव येथील विलास बागेत मंगळवारी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणीने हजारोंचा समुदाय गहिवरुन गेला. प्रार्थनास्थळी प्रारंभी विलासराव देशमुख यांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, धिरज विलासराव देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, सौ. जेनिलीया रितेश देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख यांनी पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. यानंतर काँग्रेस पक्षासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी लोकनेत्यास अभिवादन केले.

स्मृतिदिनानिमीत्त गायक मंगेश बोरगावकर, राम बोरगावकर आणि समूह यांनी स्वरांजली कार्यक्रम सादर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments