Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकरी पाकिस्तानी नाहीत; अण्णा हजारे मोदी सरकारवर संतापले

शेतकरी पाकिस्तानी नाहीत; अण्णा हजारे मोदी सरकारवर संतापले

अहमदनगर l केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. तर शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर अण्णा हजारेंनीं केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

अण्णा हजारेंनीं शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना सांगितले की, ‘आंदोलन करणारा शेतकरी हा काही पाकिस्तानातून आलेला नाही. त्यामुळे कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी वागणूक ही चुकीचीच आहे.

निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांच्या बांधावर, घरी तुम्ही मत मागायला जाता. मग त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही?’

वाचा l  ‘देवी अन्नपूर्णा’ची मूर्ती कॅनडाहून भारतात परत येणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

‘दिल्ली येथे शेतकऱ्यांवर पाण्याचे फव्वारे चालवले जात आहे. त्यात एक शेतकरी शहीद देखील झाला आहे. असं असलं तरी आज शेतकरी संयमाने आंदोलन करत आहे. उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?’ असा सवाल देखील अण्णा हजारे यांनी यावेळी उपस्थितीत करत सरकारला चांगलेच धारेवर धरले

वाचा l खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता; राऊतांचा गौप्यस्फोट

‘आज अनेक दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतं आहे. सरकार आणि शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहिली तर भारत पाकिस्तान सारखी झाली आहे. हे चित्र अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांच्या घरावर निवडणुकीवेळी मत मागायला जाता त्याप्रमाणेच त्यांच्याशी सरकारने चर्चा करायला हवी.’ अशी प्रतिक्रिया दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments