मनमाड : छगन भुजबळ यांच्यावरील संकट टळून, ते सुखरुप लवकर तुरुंगाबाहेर यावेत, यासाठी नस्तनपूर येथील शनिदेवाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले. भुजबळांचा आज वाढदिवस आहे. हेच निमित्त साधत भुजबळ समर्थकांनी शनिदेवाला साकडे घातले.
नाशिक जिल्ह्यातील नस्तनपूर हे अतिप्राचिन असं शनिदेवाचं स्थान असून, भुजबळांच्या कार्यकाळात या मंदिर परिसराचा विकास करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे दिडशे आदिवाशी मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटप राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
शनिदेवाला अभिषेक घातल्यानंतर महाआरती करण्यात आली. ज्या छगन भुजबळांनी जिल्ह्याचा, तसेच या मंदिराचा विकास केला, त्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांना दिर्घायुष्य लाभो, यासाठी शनिदेवाला साकडे घालण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.