Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र‘आरे’त दोन दिवसात 1800 झाडांची कत्तल !

‘आरे’त दोन दिवसात 1800 झाडांची कत्तल !

aarey colony axing of tree
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत 2600 झाडांपैकी 1800 झाडांची दोन दिवसात कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याला विरोध असतांनाही पोलीस बंदोबस्तात पर्यावरणी प्रेमींना धक्का बसला. 29 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 100 पेक्षा अधिक लोकांना यादरम्यान ताब्यात घेण्यात आलं होतं.

आरे कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ अद्यापही पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कलम 144 लागू करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाचे ओळखपत्रांची तपासणी करुन करुन पोलिस आत सोडत आहेत अशीही माहिती स्थानिकांनी दिली आहे. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका शुक्रवारी (4 ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर रात्रीच्या अंधारात झाडं कापण्यास सुरुवात झाली.

झाडं कापण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा याची माहिती मिळताच अनेकांनी कारशेडमध्ये घुसण्याचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी याला विरोध केला. यामुळे अनेक संतप्त पर्यावरण प्रेमींनी झाडांना मिठी मारत झाड तोडण्यास विरोध दर्शवला.

शुक्रवारी रात्रीपासून अनेक पर्यावरण प्रेमी दोन दिवसांपासून आरे कॉलनी परिसरात ठाण मांडून बसले आहे. ‘आरे वाचवा’ असे नारेही पर्यावरणप्रेमींतर्फे दिले जात आहेत. तसेच काहींनी आरे परिसरात रास्ता रोको केला. त्यामुळे आरे परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आरे परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments