Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकरी आत्महत्येचा देखावा करताना कलाकाराला गळफास

शेतकरी आत्महत्येचा देखावा करताना कलाकाराला गळफास

नागपूर : शेतकरी आत्महत्येचा देखावा करणं नागपुरातील कलाकाराच्या जीवावर बेतलं. शोभायात्रेत गळफास घेतल्याचा देखावा सादर करताना खरोखरच फास बसून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये एका ट्रॅक्टरवर शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करण्यात आला होता. २७ वर्षीय मनोज धुर्वे हा कलाकार गळ्यात दोर बांधून देखावा सादर करत होता. शोभायात्रा गांधी चौक ओलांडून पुढे जात असताना चालत्या ट्रॅक्टरमध्येच मनोजला गळफास बसला आणि तो खाली कोसळला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments