Monday, June 24, 2024
Homeकोंकणठाणेठाणे येथील गांधीनगर परिसरात सिलिंडर स्फोट!

ठाणे येथील गांधीनगर परिसरात सिलिंडर स्फोट!

cylinder blas,cylinder,blas,thane,maharashtra,mumbai,gandhinagar महत्वाचे…
१.सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत १० झोपड्या जाळून खाक
२.भीमनगर येथील गांधीनगर परिसरात घडली.
३. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.


ठाणे – सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत १० झोपड्या जाळून खाक झाल्याची घटना भीमनगर येथील गांधीनगर परिसरात घडली. ही संपूर्ण झोपडपट्टी अनधिकृत आहे. सोमवारी २६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. परिसरात  दीड हजारांपेक्षा अधिक झोपड्या आहेत. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. 

अशी लागली आग?

गांधीनगर परिसरातील एका घरामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शेजारील घरात असलेल्या तीन सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. आग लागण्याच्या घटना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला समजल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे ४ बंब, एक रेस्क्यू वाहन आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचले. अवघ्या दीड तासांमध्ये अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझवली. अग्निशमन विभागाचा बंब झोपडपट्टीमध्ये येऊ शकत नसल्याने विरोधी दिशेने बंब उभा करून पाईपलाईनवरून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गेले. यावेळी घटना स्थळी पोलीस, महावितरणचे अधिकारी आणि आणि गॅस डीलरचे कर्मचारीदेखील पोहोचले होते. आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं केवळ १० झोपड्या जळून खाक झाल्या व सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन महिण्यापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments