पुणे – अम्मीजान कहती थी कि कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता खरोखरच हा डॉयलॉग येथे तंतोतंत खरा ठरतोय. कारण पुण्यातील एक चहा विक्रेत्याची कमाई हजारातून नव्हते तर चक्क लाखो रुपयातून होत आहेत. ते सुध्दा एक,दोन नव्हे तर महिण्यातून त्याची कमाई १२ लाख रुपये एवढी आहे.
नवनाथ येवले चहा विक्रीतून महिन्याला १२ लाख रूपये कमाई करतात. नवनाथ यांच्या ‘येवले टी हाऊसचा’ चहा पुण्यात प्रसिद्ध आहे. येवले टी हाऊसला लवकरच आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवणार असल्याची माहिती समोर येत आहेत. चहाचा व्यवसायदेखील भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यास मदत करत आहे. हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. यामध्ये खूश आहे.” असे नवनाथ अभिमानाने सांगतात. सध्या येवले टी हाऊसची शहरात तीन केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात १२ कर्मचारी आहेत. येवले यांच्या व्यवसातून होणारी कमाई बघून सर्वच अवाक् होत आहेत. विशेष म्हणजे याचीच चर्चा आता सर्वत्र ऐकायला मिळत आहे.