Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडणार

शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडणार

Uddhav Thackeray shivsena
मुंबई : राज्यात शिवसेना भाजपामध्ये सत्तासंघर्ष पेटलेला असताना आज शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज सोमवारी संध्याकाळी पाच वाजता भेट घेणार आहे. या भेटीत सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवा अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती माध्यमांना दिली. शिवसेनेची भूमिका काय आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी मला सांगितली. तीच भूमिका मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापुढे मांडणार आहे असे खासदार राऊत यांनी सांगितले.

राज्यपालांशी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. त्याच अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या अनुभवाचा आम्हाला काही फायदा होतो का ते पाहणार आहोत असंही राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments