Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना धावली शरद पवारांच्या मदतीला; मुखपत्रातून भाजपाला फटकारले

शिवसेना धावली शरद पवारांच्या मदतीला; मुखपत्रातून भाजपाला फटकारले

महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवारांचे योगदान नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले.’पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले’. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली. अशी आठवण सामनामधून भाजपाला करून देण्यात आली.

‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’  असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोलापूरात विचारला होता. त्याचे उत्तर शिवसेनेच्या मुखपत्र सामनामधून अमित शाह आणि भाजपाला दिले. पवारांची पाठराखण केली. तसेच पवारांचे नातू रोहित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत’ असे सांगतानच ‘बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे ‘, असेही सामनातून म्हटले आहे.

दरम्यान, याच लेखात उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.

‘पंत चढले, राव आले ’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले, रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत,  अशा शब्दांत रोहित पवार यांच्या उत्तराची दखल घेत शिवसेना मुखपत्रातून स्तुतीसुमनांची उधळण करण्यात आली आहे.

पवारांच्या गोटातून प्रथमच इतके तीर सुटल्याचे सांगत शरद पवार यांनी आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण केले. आत त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील मूठ ढिली पडल्याचे दिसत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान नाकारता येणार नाही. असे हि सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments