Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणभाजपने मुका घेतला तरी युती नाहीः राऊत

भाजपने मुका घेतला तरी युती नाहीः राऊत

ठाणेः शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून सेनेला विविध मार्गांनी गोंजारण्याचा प्रयत्न होतोय. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. भाजपने मुका घेतला तरी आम्ही युती करणार नाही‘, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. 

शिवसेना सत्तेत नसून फक्त टेकू दिला आहे. राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी शिवसेना सत्तेत आहे, असं राऊत म्हणाले. जातीयद्वेष आणि बलात्काराच्या घटनांमुळे देशातील सामाजिक वातावरण गढूळ झालं आहे, असं सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली. तसंच शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर विरोधक जागे झालेत, असा दावा राऊत यांनी केला. डोंबिवतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments