आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २१ जूनपासून पुन्हा प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत.
यापुर्वी सलग चार दिवस मॅरेथॉन बैठक घेत राज्यातील काही जिल्हयातील राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण माहिती शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घेतली होती आणि आता पुन्हा २१ जूनपासून पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत.
२१ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता अकोला शहर, ग्रामीण, बुलढाणा, वाशीम, अमरावती शहर, ग्रामीण, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा गोंदिया तर
२३ जून रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद शहर, ग्रामीण, परभणी शहर, ग्रामीण, जालना, हिंगोली, बीड, नांदेड शहर, ग्रामीण, लातूर शहर, ग्रामीण, उस्मानाबाद, वर्धा आदी.
या बैठकांना स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेश सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार आहेत.