मुंबई : सोमवारी रात्री राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी लिलावती रूग्णालयात जाऊन राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झालाय. शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. सत्तास्थापनेसाठी आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.
दरम्यान, सर्व धावपळीत पवार कुटुंबियांनी लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन राऊतांशी भेट घेतली. जवळपास १५ मिनिटं पवार लिलावतीमध्ये होते, यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवार आणि राऊतांमध्ये जवळपास राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. त्यामुळे काही तरी वेगळं घडणार असल्याची चर्चा आहे.