Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रशरद पवार म्हणाले माझ्यापुढे सगळ्यांच्या कॉलर खाली येतात

शरद पवार म्हणाले माझ्यापुढे सगळ्यांच्या कॉलर खाली येतात

सातारा: साताऱ्यात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता मी आल्यावर काहीही पेच वगैरे नसतात. सगळ्यांची कॉलर खाली येते असे म्हणत शरद पवार यांनी कॉलरला हात लावून कॉलर खाली करुन दाखवली आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना टोला लगावत शरद पवारांनी त्यांचे नाव न घेता मिश्किल अर्विभावात टीका केली.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये उदयनराजे समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत. हा पेच नेमका का निर्माण झाला आहे असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल प्रतिक्रिया दिली. उदयन राजे यांच्याबाबतच्या प्रश्नावर शरद पवार यांनी अनेक दिवसांनी त्यावर मिश्किल शैलीत उत्तर दिले. एरवी उदयनराजेंबाबत विचारले असता ते कायम शांतपणे प्रतिक्रिया देतात. मात्र आज त्यांनी पत्रकार परिषदेत उदयन राजेंबाबत विचारले असता काहीही पेच वगैरे नाही. मी आलो की सगळे सरळ होतात. असे म्हणत या प्रश्नाच्या उत्तरात उदयन राजे यांची खिल्ली उडवली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्यात पत्रकार परिषद सुरु असताना दरवाजा लॉक झाल्यामुळे सभागृहात अडकून पडले होते. पवारांसह काही पत्रकारही आतमध्ये अडकले होते. बरेच प्रयत्न करुनही दरवाजा उघडत नसल्यामुळे अखेर दरवाजा तोडून शरद पवारांना बाहेर काढावे लागले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी बुधवारी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments