Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रडीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्या गाडीला अपघात!

डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्या गाडीला अपघात!

DYSP Prerna Katteसातारा : आज पहाटे साडेतीनच्या सुमारास साताऱ्याच्या डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना सातारा येथील डायग्नोस्टीक रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुट्टे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

आज पहाटे साडेतीनच्या सुमारास रहिमतपूर ते औंध मार्गावर पिंपरी फाट्याजवळ कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा जीवन कट्टे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कट्टे यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ साताऱ्याच्या डायग्नोस्टीक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या अपघाताचे नेमके कारण अजून समजलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments