Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रएटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!

एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!

राष्ट्रवादी काँग्रेसची फेसबुक पोस्ट

sachin-vaze-case-ncp-alleges-that-volvo-car-seized-by-ats-belongs-to-builder-close-to-devendra-fadnavis-news-updates
sachin-vaze-case-ncp-alleges-that-volvo-car-seized-by-ats-belongs-to-builder-close-to-devendra-fadnavis-news-updates

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एटीएसने एक महागडी कार जप्त केली आहे. ही व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त करण्यात आली आहे. एटीएस आणि फॉरेन्सिक टीमकडून या कारची तपासणी करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेली व्हॉल्वो कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधल्या एका बिल्डरची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. तशी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पेजवरुन करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची फेसबुक पोस्ट

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट! महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर. मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे, ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

‘मनिष भतिजा प्रसाद लाड यांचे व्यावसायिक पार्टनर’

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी 24 एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते, त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट

महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?

देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 3.6 कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली

नवी मुंबईतील सुमारे 1767 कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 3.6 कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत. अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन करण्यात आली आहे.

वाचा: रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट ; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल 

चूर्ण सदृश्य बाटल्या आणि सॅनिटायझरचा कॅन

न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) टीमला वॉल्व्हो कारच्या डिकीमधून दोन बॅग सापडल्या आहेत. त्यामध्ये जीन्स आणि पांढरा शर्ट मिळाला आहे. त्या बरोबरच एक मास्क आणि मोबाईल चार्जरही आढळला आहे. एकूण तीन जोड कपडे आणि टॉवेल सापडले आहेत. गाडीच्या स्टेपनीच्या जागेत एका बॉक्समध्ये दोन चूर्ण सदृश्य बाटल्या, एक सॅनिटायझरचा कॅन मिळाला. गाडीत सापडलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर बोटांचे ठसे चेक केले जात आहेत. गाडीत पायाखाली असलेल्या मॅट झटकून त्यावरची माती ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीत अन्यत्र कुठेही बोटांचे ठसे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

व्हॉल्वो कार वाझेंच्या पार्टनरची?

दमण येथे सापडलेली ही कार सचिन वाझेंच्या पार्टनरची असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एटीएसने दमण येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमणमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेंच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे. तर दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अँटालिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments