भाजपने मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेतील नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पत्ता कट केल्यानंतर खडसेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खडसे म्हणाले की, आपण पक्षाच्या आदेशाचं पालण करणारं असून,निर्णय कटू असलं तरी तो स्वीकारणारं आहे. रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवतील असे जाहीर केले.
खडसे म्हणाले की, समर्थकांच्या भावना पक्षाला कळवल्या. पक्षाने नवीन उमेदवाराला संधी दिली. पक्षासमोरही समस्या असतात अशी सारवासारव केली. सर्व कार्यकर्त्यांना रात्रंदिवस एक करुन कामं करावं, रोहिणी खडसेंना सहकार्य करावं अशा सूचना केल्या. पत्रकार परिषदेनंतर रोहिणी खडसेंच उमेदवारी अर्ज भरण्यातं येईल असे खडसेंनी सांगितले.
भाजपने खडसेंच्या कन्या रोहिणी यांना खडसे यांना उमेदवारी दिली आहे. रोहिणी खडसे निवडणूक लढणार नाही अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता सर्व चित्र स्पष्ट झाले आहे.