Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींना ‘हम दो हमारे दो’ म्हणायचं असेल तर आधी लग्न करावं...

राहुल गांधींना ‘हम दो हमारे दो’ म्हणायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल : रामदास आठवले

ramdas-athawale-criticize-rahul-gandhi-over-ham-do-hamare-do-remark
ramdas-athawale-criticize-rahul-gandhi-over-ham-do-hamare-do-remark

नवी मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध केल्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींवर खोचक टीका केलीय. नवे कृषी कायदे दोन उद्योगपतीचे आहेत हे म्हणत राहुल गांधींनी हम दो हमारे दो अशी टीका केली होती. याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी राहुल गांधींना हम दो, हमारे दो म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल, अशी खोचक टीका केलीय. ते वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “मोदी सरकारने नवे कृषी कायदे अदानी आणि अंबानींसाठी आणल्याची टीका होते. मात्र, ती अत्यंत चुकीची आहे. त्यांना नफा कमवायला अनेक दुसरे उद्योग आहे. त्यांना शेतीवर उद्योग करायचे आहेत असं नाही. राहुल गांधी म्हणतात की ‘हम दो, हमारे दो’. राहुल गांधींना असं म्हणण्यासाठी लग्न करावं लागेल. हम दो, हमारे दो असा आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. हा कायदा चांगला आहे.”

“काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाच्या शूटिंग होऊ देणार नाही असं म्हटलंय. महाराष्ट्रात गुंडाराज नाही. तुम्ही असं विधान करू शकत नाही. तुम्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाचे शूटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे येतील. मी लवकरात लवकर अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी स्वतः जाणार आहे.”

रामदास आठवले म्हणाले, “आगामी सर्व महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजप बरोबरच युती करणार आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला 25 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. तसा प्रस्ताव आम्ही भाजपकडे ठेवला आहे. शेवटी आम्हाला 6 ते 7 जागा मिळाल्या पाहिजे, अशी अपेक्षा करतो. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार हे कायमस्वरूपी चिन्ह नसल्यामुळे भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील.”

आमदार गणेश नाईक यांच्या इंटरनॅशनल डॉन या वक्तव्यावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, “मी नाईकांना ओळखतो. गणेश नाईक यांचे कोणत्याही डॉन सोबत संबंध नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments