Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्ररामदास आठवले सत्तेचा तिढा सोडण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी

रामदास आठवले सत्तेचा तिढा सोडण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी

Shiv Sena should change role - Ramdas Athawaleसत्तेचा गुंता अद्यापही सुटला नाही. त्यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहचले. यामुळे आठवले हे गुंता सोडवण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर येत आहे.

आठवले हे भाजपासोबत असून त्यांनी कालच एक विधान केलं होतं. की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेनेला मदत कर नाहीत. माझे दोन्ही पक्षासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे या नेत्यांची समजूत काढेल असे सांगितले होते. तसेच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमिवर सत्तेची कोंडी सुटलेली नाही. दोन्ही काँग्रेस हे शिवसेनेला मदत करतील म्हणून त्यांना रोखण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत अशी शक्यता आहे.

दरम्यान, दोन्ही काँग्रेसने आधीच स्षष्ट केले की, आमच्याकडे शिवसेनेचा प्रस्ताव आलेला नाही. मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिेलेला आहे. त्यामुळे आठवले काही निरोप घेऊन पवारांकडे घेऊन गेले का अशीची चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments