Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रMNS l वीज बिल भरु नका; राज ठाकरेंचा एल्गार

MNS l वीज बिल भरु नका; राज ठाकरेंचा एल्गार

 मुंबई l मनसे कार्यकर्त्यांकडून आज राज्यभरात वाढीव वीज बिलावरुन आंदोलन सुरु आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबादसह राज्यात वीज बिल माफ करण्याची मागणीसाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्रातील जनतेला वीज बिल भरु नका असं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला वीज बिल भरु नका असं आवाहन केलं आहे. जर वीज पुरवठा बंद करण्यासाठी कोणी आलं तर महाराष्ट्र सैनिकांसोबत संघर्ष होईल असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यासंबंधीचं निवेदन मनसे नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

राज ठाकरेंनी निवेदनात म्हटलं की

“या सरकारनं वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरु केली. हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल तर मग आम्हाला जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काही झालं तरी वाढीव वीज देयकं भरु नका असं आवाहन केलं आहे.

असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकारच्या तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

वाचा l  उद्या धमाका, संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो

 “जनतेच्या तीव्र भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. राज ठाकरेंनी एक पत्र त्यांना दिलं आहे ते आम्ही त्यांच्याकडे सोपवलं आहे. आमच्या आणि जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्या जनतेपर्यंत पोहचवा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे.

यापुढे वीज बिल भरलं नाही किंवा काही कारवाई झाली नाही आणि कर्मचारी वीज कापायला आले तर त्यांच्या कानाखाली कोणी इलेक्ट्रिकचा शॉक काढला तर त्याची जबाबदारी मनसे नाही तर महाराष्ट्र सरकारचा राहील,” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

वाचा l Vitthal Rukmini l अजित पवार यांचं विठुराया चरणी ‘हे’ साकडं

यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”. असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments