Placeholder canvas
Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल

पुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल

पुणे: पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये राहत असलेल्या एका परदेशी जोडप्यामध्ये अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती करणाऱ्या पतीविरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे. ३१ वर्षीय इराणीयन महिलेने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनसैर्गिक पद्धतीने सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करण्याबरोबरच पती आपल्याला शिवीगाळही करतो असा आरोप या महिलेने केला आहे.

तक्रारदार महिला मूळची इराणची असून तिचा पती ऑस्ट्रेलियन व्यावसायिक आहे. सध्या हे जोडपे पुण्यात कल्याणी नगरमध्ये राहायला आहे. येरवडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. नवरा आपल्याला मारहाण करतो तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देतो असे या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

येरवडा पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३७७,३२३, ५०४ आणि ५०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार २०१३ साली एका कॉमन मित्राच्या माध्यमातून तिची आरोपीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. जुलै २०१५ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

डिसेंबर २०१७ पर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. पण त्यानंतर नवऱ्याने आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली. नवरा मध्यरात्री केव्हाही उठवून अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती करु लागला. जर मी त्याची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला तर मला शिवीगाळ करायचा. त्याला विरोध केला तर मला मारहाण करायचा असे या महिलेने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments