Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपुण्यात हॉटेलमध्ये भरधाव कार घुसल्याने एक ठार

पुण्यात हॉटेलमध्ये भरधाव कार घुसल्याने एक ठार

Car Accident, Pune

पुणे: पुण्यात सोमवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. पुण्यातील सांगवी परिसरातील फेमस चौकात दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. एका वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट अनंत भोजनालयात घुसली.

अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली आहे. सुदैवाने यावेळी भोजनालयात कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सचिन जाधव चालकाच नाव आहे.

गाडीत मुलगा, महिला आणि चालक होता. कारचालक सचिन आणि महिला जखमी झाले आहेत. निखिल पुरोहित असे गाडीच्या मूळ मालकाचे नाव आहे. मृत व्यक्तिचे नाव समजलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments