Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन

नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी पुस्तक नो होल्ड्स बार्ड आणि झंझावात या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राणे म्हणाले कि,

नारायण राणे; आमदार झालो तेव्हा मंत्री व्हायचं होतं. मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री बनायचं होतं. ते झालो. आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही.  माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय. पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागतं आहे, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी खंत व्यक्त केली आहे.

मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे, काही गोष्टी टाळल्या आहेत. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे. आम्ही पक्ष वाढवायला, वाचवायला काम केलं. आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असेही राणे म्हणाले.

आज नारायण राणेचं जे कौतुक केलं ते माझं नाही तर बाळासाहेबांचं कौतुक आहे. बाळासाहेब माझं भाषण ऐकून सांगायचे तो किती फास्ट बोलतो, हळू बोल. साहेबांनी आम्हाला असं घडवलं. तो काळ पुस्तकात गाळला आहे, असं राणे म्हणाले. बाळासाहेबांना 6 पानी पत्र लिहिलं मी शिवसेना सोडतो आहे. दुसऱ्या दिवशी साहेबांनी फोन केला. नारायण रागावला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन. साहेब हे साहेब होते, प्रेम फक्त साहेबांवर केलं, असेही राणे यावेळी म्हणाले.

370 कलम ज्या दिवशी होतं, त्या दिवशी गडकरी व्यस्त होते. मी जेव्हा सांगितलं की पुस्तक प्रकाशन आहे. त्यांनी तात्काळ वेळ दिली. आपल्या मित्राला आनंद होईल असं वागले. मंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार एका फोन वर आले. तटकरे फोन न करता आले. मुख्यमंत्र्यांकडे पुस्तक प्रकाशनासाठी वेळ मागितला पण दिला नाही, असे ते म्हणाले.

या प्रकाशन सोहळ्यात नितीन गडकरी आणि शरद पवार हे नारायण राणे बद्दल बोलत असताना म्हणाले कि,

नितीन गडकरी; जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मी त्यांच्यावर रागावलो होतो.  मी त्यांना सांगितलं हे करू नका.  ह्यात तुमचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या विचाराचे नुकसान आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ‘मी हा निर्णय आनंदाने घेत नाही’, असं देखील राणे म्हणाले होते. माझ्या हृदयात माझे नेते म्हणून दोन नेत्यांचे स्थान आहे मुंडे साहेब आणि राणे साहेब, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नारायण राणे यांची स्तुती केली गडकरी यावेळी म्हणाले की, राणे साहेबांच्या जीवनात त्यांनी छलकपट कधी केले नाही. ते काँग्रेसमध्ये गेले नसते तर आज राजकारणाचं वेगळं चित्र असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं.  तुम्ही असाच संघर्ष करत राहा, आपण एकमेकांचा हात पकडला आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात जा. असं होणार नाही, पण तरीही आपण एकत्र राहू, असेही गडकरी म्हणाले.

शरद पवार; नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता. राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता. या घालमेलीतून त्यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी  काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रंगत आणली. पवार पुढे म्हणाले की, विरोधी पक्षात काम करण्याचा जो आनंद मिळतो, तो सत्तेत मिळत नाही. विरोधात असताना शेवटच्या माणसाला भेटता येतं. आपल्यावर कोणती जबाबदारी नसते. त्यामुळे बोलताही येतं. सत्तेत आल्यावर अनेक बंधनं येत असतात. फक्त विरोधात असताना कायम इथेच राहू,असा भ्रम मात्र करु नये. दिवस बदलत असतात, असंही पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments