मुंबई: पद्मावती चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या सर्व चित्रपट गृहांना पोलिस संरक्षण देण्यात येईल अशी माहीती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. यामुळे पद्मावतीला होणारा विरोध अजून वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पद्मावती चित्रपटावरुन गोंधळ सुरु आहे. राजपूत करणी सेनेसह काही राजकीय पक्षांच्या चित्रपट संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. करणी सेनेच्या अध्यक्षाने तर अभिनेत्री दिपीका पदूकोणचे नाक झाटण्यात येईल असा इशारा दिला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले.