Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्र'या' संवेदनशील मतदान केंद्रांना पोलिसांचा गराडा

‘या’ संवेदनशील मतदान केंद्रांना पोलिसांचा गराडा

Mumbai Policeमुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ६६१ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आले.  मुंबई शहर जिल्ह्य़ात ३२५ मतदान केंद्रे, तर पुणे जिल्ह्यात २५२ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. राज्यात तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ६६१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्ह्य़ात ३२५ मतदान केंद्रांचा समावेश आहे. २५२ मतदान केंद्रे पुणे जिल्ह्य़ात आहेत. अमरावती जिल्ह्य़ात २१७, गोंदियात १२६, औरंगाबादमध्ये १००, नाशिक ९६, वाशिमला ८५, सोलापूर ८७, तर बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्य़ांत ५० ते ५५ च्या दरम्यान मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून या ठिकाणच्या मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
या भागात एकही मतदानकेंद्र संवेदनशील नाही…
नक्षलप्रभावीत गडचिरोलीसह वर्धा, बुलढाणा, अहमदनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्य़ांत एकही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही. आतापर्यंत ३३ उमेदवारांसह १७७९ जणांविरोधात आचारंसहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments