Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रसांगलीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू

सांगलीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू

सांगली: चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली. अनिकेत कोथळे असे या आरोपीचे नाव असून अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे.

कोल्हापूर रस्त्यावर एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय २६) आणि अमोल भंडारी (वय २३) या तरुणांना अटक केली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या बाजूला डिटेक्शन ब्रँचचे ऑफीस असून सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचच्या कार्यालयात नेले जात होते. या दरम्यान दोन्ही आरोपींनी पळ काढल्याचे पोलिसांनी म्हटले होते. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा देखील नोंदवला होता. यातील अमोल हा मंगळवारी संध्याकाळी निपाणीत सापडला असला तरी अनिकेतचा थांगपत्ता लागत नव्हता.

अनिकेतचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता. अनिकेतचे नातेवाईक आणि शहरातील नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. बुधवारी अनिकेतचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक योगेश कामठे आणि पोलीस कर्मचारी अनिल लाड, अरूण टोणे, सुरज मुल्ला, राहुल शिंगटे, झाकीर पट्टेवाला यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघड होताच सांगलीत तणाव निर्माण झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे समजते. सर्व आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments