Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींकडून मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींकडून मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

PM Narendra Modi Mumbai Metro
Mumbai Development Project
Screengrab

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईमधील अंधेरी ते दहिसर या ३५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका २ ए आणि ७ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मुंबईत विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभही केला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

दहिसर पूर्व आणि डीएन नगरला जोडणारी मेट्रो मार्गिका २ ए सुमारे १८.६ किमी लांब आहे, तर अंधेरी पूर्व – दहिसर पूर्व ला जोडणारी मेट्रो मार्गिका ७ सुमारे १६.५ किमी लांब आहे. सुमारे १२,६०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मार्गांची पायाभरणीही २०१५ मध्ये पंतप्रधानांनी केली होती. या मेट्रो पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत.

यावेळी, त्यांनी मुंबई १ मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) लाँच केले. हे अॅप प्रवास सुलभ करेल, मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारावर दाखवता येईल आणि युपीआयद्वारे तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल व्यवहारांना समर्थन देईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल. त्याचप्रमाणे, लोकल ट्रेन्स आणि बसेससह सार्वजनिक वाहतुकीच्या इतर पद्धतींमध्ये देखील विस्तारित केले जाऊ शकते. प्रवाशांना अनेक कार्ड्स किंवा रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही; नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड जलद, संपर्करहित, डिजिटल व्यवहार सक्षम करेल, ज्यामुळे प्रवास प्रक्रिया सुलभ होईल.

सुमारे १७,२०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. त्यांची एकत्रित क्षमता सुमारे २,४६० एमएलडी असेल.

मुंबईतील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान २० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन केले.

पंतप्रधान मोदींनी मुंबईतील सुमारे ४०० किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवात केली. हा प्रकल्प सुमारे ६,१०० कोटी रुपये खर्चून केला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही त्यांनी केली. जगप्रसिद्ध प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे संवर्धन आणि पुनर्स्थापना या उद्देशाने पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. हा प्रकल्प १०० कोटींहून अधिक खर्च करून पूर्ण केला जाणार आहे.

 

Web Title: Pantapradhan Modinkadun metrosah vividh vikas prakalpanche udghatan

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments