Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्र१४ वर्षीय शाळकरी मुलाची रेल्वेखाली आत्महत्या!

१४ वर्षीय शाळकरी मुलाची रेल्वेखाली आत्महत्या!

१. नाशिकमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे.
२. शिकवणीसाठी जातो असं सांगून घरातून निघाला
३. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट


नाशिक : नाशिकमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. आज रविवारी सकाळी .३० वाजण्याच्या सुमारास लालपूल परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेससमोर आत्महत्या केली.  सचिन पाळदे असे आत्महत्या करणाऱ्या मुलाच नावं आहे. देवळाली कॅम्प परिसरात महालक्ष्मी मंदिराजवळ तो राहणारा होता.

आज सकाळी सचिन पाळदे या १४ वर्षीय हा शाळकरी विद्यार्थी शिकवणीसाठी जातो असं सांगून घर सोडलं. त्यानंतर लालपूल परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेससमोर त्याने आत्महत्या केली. दुपारी काही स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. सचिन हा देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी असून तो नववीत शिकत होता. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments