Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंना पक्षाचा निरोप, ‘तुम्हाला तिकीट नाही’ !

एकनाथ खडसेंना पक्षाचा निरोप, ‘तुम्हाला तिकीट नाही’ !

eknath-khadse,Assembly Elections 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अखेर पक्षाने निरोप पाठविला. तुम्हाला तिकीट मिळणार नाही. त्यामुळे  खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. खडसे यांना तिकीट तिस-या यादीत तरी स्थान मिळेल अशी अपेक्षा होती परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कट केला.

भाजपच्या वरिष्ठांनी पक्षातील काही दिग्गजांचे पंख झाटण्याचे काम सुरु केले आहे. दिग्गजांना उमेदवारी दिली नाही म्हणून तीन दिवसांपासून घोळ सुरु आहे. मात्र एकनाथ खडसेंनी आधीच आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पक्षाने आता त्यांना निरोप दिला. तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे खडसे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खडसेंच्या मुलीला तिकीट दिला जाईल अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र पक्षाकडून  अद्यापही काही सांगण्यात आले नाही. एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. आतापर्यंत पक्षाचं खूप ऐकलं. स्वत:च्या राजकारणासाठी स्वार्थी राजकारण करत आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा खडसे समर्थकांनी दिला.

खडसे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची समजतू घातली. पक्षाचे कार्यकर्ते खडसेंच्या निवसास्थानी ठिय्या मांडून बसले आहे. तुम्ही 3 दिवसांपासून इथे आहात. आपण सर्वजण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपण पक्षाच्या आदेशाचे नेहमीच पालन करत आलो आहे. मला स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं, तेव्हा एका मिनिटात राजीनामा दिला. पक्षाने मंत्रिपद दिलं, पक्षाने आदेश दिला मंत्रिपद सोडलं. त्यामुळे आपल्या भावना स्वाभाविक आहे. गेली 30 वर्ष तुम्ही मला निवडून देत आहात. भाजपचं अस्तित्व इथे नव्हतंच, अशा परिस्थितीत तुमच्या सहकार्याने पक्ष वाढला.

एखादा विषय आपल्या आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षाने मला सांगितलं तुम्हाला तिकीट देणार नाही, तुमच्याऐवजी कुणाला द्यायचं हे तुम्ही सांगा. त्यावर मी सांगितलं की आपण काही सांगू शकणार नाही, कारण माझे सारे कार्यकर्ते हे एकनाथ खडसे आहेत.  मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझं समाधान होईल, नाही उत्तर दिलं तरी चालेल. मी काही इतका मोठा माणूस नाही की पक्षाला काही विचारू शकेन. जो काही पक्ष निर्णय घेईल, तो आपण मान्य करु. शांतता ठेवा. असं एकनाथ खडसे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments