Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन आगे खून खटला सर्वोच्च न्यायालयात लढवू- न्यायमूर्ती थूल

नितीन आगे खून खटला सर्वोच्च न्यायालयात लढवू- न्यायमूर्ती थूल

अहमदनगर : खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

थूल यांनी मंगळवारी खर्डा येथे मयत नितीन आगे याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन चर्चा केली. थूल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे या प्रकरणाची वस्तुस्थिती समजवून घ्यावयाची आहे. या खटल्यात जिल्हा न्यायालयात काय त्रुटी राहिल्या, शासनाला अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात कशा पद्धतीने मदत करता येईल याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे. आगे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. तसेच हा खटला वरिष्ठ न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमून पुढील कार्यवारी करण्यात येईल. वेळ पडली तर हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयातही लढण्याचीही शासनाची तयारी असल्याचे थूल म्हणाले. दरम्यान खर्डा येथे आगे कुटुंबीयांना महसूल विभागाकडून घर देण्याचे आश्वासन थूल यांनी दिले. मयत नितीन याचे वडील राजू आगे यांनी आम्हाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी खासदार अमर साबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments