Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रहसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर; कार्यकर्ते, समर्थक आक्रमक

हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर; कार्यकर्ते, समर्थक आक्रमक

छापेमारीचे वृत्त समजताच मुश्रीफ यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ED Raids on Hasan Mushreef राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार आणि माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर शनिवारी सकाळी ईडीने छापेमारी केली. मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यातील ईडीने केलेली हि दुसरी कारवाई आहे.

दरम्यान, छापेमारीचे वृत्त समजताच मुश्रीफ यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापा टाकला होता.

गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना येथी कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणात कला पैसे गुंतवल्याचे आरोप मुश्रीफ यांच्यावर केले होते. परंतु, मुश्रीफ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

दरम्यान,मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “राज्यात विरोधकांना लक्ष्य केलं जात असून किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे”, असा आरोप त्यांनी या याचिकेद्वारे केला होता.

यासंदर्भात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांच्याकडे कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी कशी उपलब्ध झाली? असा सवाल करत त्यांच्याविरोधात पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: NCP leader Hasan Mushrif again on ED’s radar; second raid within two months

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments