Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रकिरीट सोमय्या यांना मुंबई हायकोर्टाचा दणका; न्यायालयीन प्रक्रियेची प्रत कशी मिळवली? न्यायालयाचा...

किरीट सोमय्या यांना मुंबई हायकोर्टाचा दणका; न्यायालयीन प्रक्रियेची प्रत कशी मिळवली? न्यायालयाचा सवाल

२४ एप्रिलपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Bombay High Court on Kirit Somaiyyaभाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरुद्धच्या फौजदारी खटल्यात न्यायालयीन प्रक्रियेची प्रत कशी मिळवली?’ याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

तसेच, २४ एप्रिलपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे, ईडीच्या छापेमारीमुले अडचणीत आलेले मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांच्याकडे कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी कशी उपलब्ध झाली ? असा सवाल केला.

Web Title: Bombay HC slams Kirit Somaiya; Asks How to obtain copy of court process?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments