Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा पाठिंबा?

शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा पाठिंबा?

Congress Shiv Sena NCP
भाजपला सत्तास्थापन करण्याचा निमंत्रण राज्यपालांनी दिलं आहे. परंतु भाजपकडे सत्तास्थापनासाठी 145 आमदारांच संख्याबळ नाही. त्यामुळे शिवसेना सत्तास्थापन करणार आहेत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पाठिंबा देतील जवळपास निश्चित झालं आहेत. यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

शिवसेना आमदारांचा मुक्काम द रिट्रीट हॉटेल तर काँग्रेस आमदार जयपूरमध्ये आहेत. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापन्यासाठी निमंत्रण दिलं आहे. सत्तास्थापन करण्याचा दावा करायचा की नाही याबाबत भाजपनं अद्यापही निर्णय घेतला नाही. वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहेत. जयपूरमध्ये काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शिवसेना आमदारांची बैठक घेणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे रात्रीपासून द रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांसोबत मुक्काम करत आहेत. आज रविवारी सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बनणार असल्याचं सांगितलं. भाजपने सत्तास्थापन करावी असा टोला लगावला व शुभेच्छा दिल्या. मात्र दुसरीकडे सत्तास्थापन्यासाठी शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत पूर्ण प्लॅन तयार करुन ठेवला असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments