Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत ११,५०० हून अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत ११,५०० हून अधिक पोलीस सुरक्षेसाठी तैनात

३१ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, उपनगरातील वांद्रे येथील बँडस्टँड आणि इतर प्रमुख ठिकाणी मोठा मेळावा होण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Mumbai
Mumbai Police
New Year नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस शहरातील प्रमुख ठिकाणी ११,५०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.

३१ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, उपनगरातील वांद्रे येथील बँडस्टँड आणि इतर प्रमुख ठिकाणी मोठा मेळावा होण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

ऱ्राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पोलीस आणि क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) यांच्यासह ११,५०० हून अधिक पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जातील, असे ते म्हणाले.

३१ डिसेंबर रोजी सुरळीत वाहन व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलीसही कर्तव्यावर असतील, असे त्यांनी सांगितले. सुमारे १०,००० पोलिस कॉन्स्टेबल, १,५०० अधिकारी, २५ पोलिस उपायुक्त आणि ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त सुरक्षा तैनातीचा भाग असतील, असे ते म्हणाले. याशिवाय, ४६ एसआरपीएफ प्लाटून, ३ दंगल नियंत्रण पोलिस तुकड्या आणि १५ क्विक रिस्पॉन्स टिम देखील तैनात केले जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title: Navin varshachya purvasandhyela mumbait 11,500 hun adhik police surakshesathi tainat

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments