महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शुक्रवारी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले की, राज्य सरकारने ७०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतून ४५ हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले की, मंजूर झालेल्या ७०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांपैकी ४४,००० कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या विदर्भात मंजूर करण्यात आले आहेत.
“आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि विरोधकांनी त्याचं कौतुक करायला हवं होतं पण तसं झालं नाही,” असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राज्य सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांचे कौतुक करत ते म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत कोरोनामुळे राज्य नैराश्यात गेले आहे. आम्ही आल्यानंतर राज्याच्या प्रगतीसाठी काम केले. विशेष म्हणजे, राज्य सरकार राज्यभरात ७०० बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरू करत आहे.”
Web Title: 70,000 Kotinchya Guntvanukichya Prakalpanna Manjuri; Mukhyamantryanchi Vidhansabhet Gwahi