नागपूर: आपण लवकरच राहुल गांधींना भेटणार असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला आहे. गेले काही दिवस नाना पटोले भाजप विरोधी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भाजपचे पूर्व विदर्भातून खासदार नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र होते आहे.
नाना पटोलेंना राहुल गांधींनी फोन केला होता. भेटायची इच्छा व्यक्त केली होती. अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे. तसंच आडवाणींची ज्या पक्षात अशी दुरावस्था झाली तिथे बाकीच्यांचं काय होणार असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला आहे. भाजपमध्ये अनेक लोक पक्षाच्या आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं वक्तव्यही नाना पटोलेंनी केलं आहे.यामुळे नाना पटोलेंनी आता भाजपला घरचा आहेर दिला आहे. आता पटोले-राहुल भेटीत काय होतं आणि खरंच नाना पटोले काँग्रेसमध्ये जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर?
RELATED ARTICLES