Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआदिवासी रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणार - राज्यमंत्री डॉ.परिणय फुके

आदिवासी रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणार – राज्यमंत्री डॉ.परिणय फुके

मुंबई : आदिवासी समाजातील रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान होण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य विषयक उपक्रमाबाबतआढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. परिणय फुके म्हणाले, आदिवासी समाजातील रुग्ण व आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आदिवासी विभागाची जबाबदारी आहे. एखादा रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त असल्यास त्याच्यावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेत आधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसह सर्व आदिवासी समाजासाठी सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम राबविण्याबाबतचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या दरम्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

राज्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ज्वलंत असल्याने यावर आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी सी.सी.टी.व्ही यंत्रणा वापरली जाते. सी.सी.टी.व्ही च्या फुटेजमुळे विश्लेषण होतेच असे नाही. या परिस्थितीवर तोडगा म्हणून नव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सी.सी.टी.व्ही च्या फुटेज मधून विश्लेषणात्मक माहिती मिळवणारी यंत्रणा उपयोगात आणणार असल्याचे श्री. फुके यांनी सांगितले.

यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. वी.आर श्रीनिवास, आदिवासी विकास आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, आदिवासी विकास विभागाचे उप सचिव श्री.ढोके,  पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विश्लेषक अभिषेक किनिंगे, नव उद्योजक व युवा संशोधक यशराज भारद्वाज, सी.एम.फेलो डॉ. साफवान पटेल, डॉ. मयुर मुंडे तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments