मुंबई: राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर आज वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. तसेच पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राठोड यांचा बळी घेऊ नका ते समाजाचे नेते आहेत. संपूर्ण तपास करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. विरोधकांनी,माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी अशी विनंती केली आहे.
पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र वाचा…
पूजा चव्हाण यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. त्यामध्ये नमूद केले की, 7 फेब्रुवारी रोजी पूजाचा जो मृत्यू झाला तो दुर्देवी आहे. तो आमच्यासाठी त्रासदायक आहे. पूजावर खूप गलिच्छ आरोप लावून वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसूलट बातम्या येत आहे. ते आरोप सर्व बातम्या निराधार आहेत. या घटनेचा तपास वेगाने व्हावा जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई कराल याची खात्री करावी.
कुणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणती मागणी आम्ही केली नव्हती. आमची मुलगी आम्ही गमावली परंतु या आड राजकारण करुन संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेवू नका.
तपासामध्ये संजय राठोड किंवा अन्य कुणी दोषी असल्यास कठोर कारवाई करुन न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावर आरोप करु नये. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. राजकारामुळे किंवा दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या पत्रामध्ये पूजाचे वडील लहू चव्हाण आई व बहिणींच्या सह्या आहेत.