Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणे‘या’ मार्गावरील पॅसेंजर गाड्या १५ जानेवारीपर्यंत रद्द

‘या’ मार्गावरील पॅसेंजर गाड्या १५ जानेवारीपर्यंत रद्द

Railway Megablock cancelमुंबई : मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मंकी हिल आणि कर्जतदरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरील काही किरकोळ कामं आणि वेगमर्यादेमुळे पॅसेंजर गाड्या १५ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात बोरघाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळे प्रवाशांना फटका बसला आहे.

सीएसएमटी-पंढरपूर-सीएसएमटी, पनवेल-पुणे-पनवेल यासह अन्य पॅसेंजर गाड्या पुढील १५ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत, तर कोयना एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे. पावसाळ्यात बोरघाटातील मंकी हिल आणि कर्जतदरम्यान रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करतानाच अन्य मार्गावरुन वळवण्यात आली होती. पुलाच्या विस्तारासह काही महत्त्वाची कामं पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र काही किरकोळ कामं अद्यापही बाकी आहेत. या कामांसाठी मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक्स्प्रेस-पॅसेंजर गाड्यांसाठी प्रतितास २० किलोमीटरची वेगमर्यादाही आखली आहे. वेगमर्यादेमुळे अन्य एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शिल्लक कामं पूर्ण करतानाच वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी पॅसेंजर गाड्या १५ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या केल्या रद्द…

-पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर गाडी १५ जानेवारी २०२० पर्यंत रद्द
५०१२७ सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर गाडी २ ते ४ जानेवारी आणि ९ ते ११ जानेवारीपर्यंत रद्द
५१०२८ पंढरपूर-सीएसएमटी पॅसेंजर ३ ते ५ जानेवारी आणि १० ते १२ जानेवारीपर्यंत रद्द

-सीएसएमटी ते बिजापूर १ जानेवारी, ५ ते ८ जानेवारी आणि १२ ते १५ जानेवारी रद्द

– ५१०३० बिजापूर ते सीएसएमटी पॅसेंजर १ आणि २ जानेवारी, ६ ते ९ जानेवारी, १३ ते १५ जानेवारीपर्यंत रद्द
१५ जानेवारीपर्यंत भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली असून सीएसएमटी ते कोल्हापूर ते
सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातून सुटणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments