Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्ली दरबारी फिल्डींग

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्ली दरबारी फिल्डींग

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असून उध्दव ठाकरेंसह सहा मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. आता शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदाचं वाटप होणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे नेते वर्णी लागावी यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत. सोनिया गांधी कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहेत. महाराष्ट्राचे काँग्रेसनेते आज दिल्लीत पक्षातील जेष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक आमदार दिल्लीत आले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत खातेवाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. काँग्रेसचे काही नेते आपल्या समर्थकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी यासाठीदेखील प्रयत्नात आहे.

काँग्रेसला 13 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी कोणकोणत्या आमदाराला मंत्रीपदाची संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दिल्लीत आज काय होणार, कोणाल संधी मिळणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments